पार्श्वभूमी
विविध महाविद्यालयांतील मराठी भाषा व वाङ्मयमंडळे आपापल्या स्तरावर भक्कम व्हावीत, त्याद्वारे विद्यार्थीकेंद्री व भाषाकेंद्री असे व्यापक कार्यक्रम राबवले जावेत, त्यात सातत्य यावे, तसेच विविध मराठी भाषा व वाङ्मय मंडळांमध्ये आदानप्रदान व्हावे यासाठी मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी या गटाची स्थापना करण्यात आली आहे.
ध्येये – उद्दीष्टे
- महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळांची स्थापना होण्याकरता पाठपुरावा करणे. यासाठी सर्व विद्यापीठे आणि महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करणे.
- मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालांत मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळांची स्थापना झाली आहे की नाही आणि त्यांची कार्यपद्धती व सद्यस्थिती काय याचा आढावा घेणारा प्रकल्प राबवणे.
- विविध महाविद्यालयांतील मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळांना जोडण्यासाठी प्रयत्न करणे.
- राज्यभरात महाविद्यालयांतील मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळांच्या प्रतिनिधींचे विद्यार्थी मेळावे आयोजित करणे. या मेळाव्यांच्या माध्यमातून मराठी भाषेसमोरील प्रश्नांविषयीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून विद्यार्थ्यांना भाषा विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचा प्रयत्न करणे, तसेच मराठी भाषेशी संबंधित व्यावसायिक व रोजगाराच्या संधींशी विद्यार्थ्यांना परिचित करणे.
- मराठी भाषेसाठीचे कार्यकर्ते महाविद्यालयांतच घडावेत यासाठी मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करणे.
कार्य
- सन २००८ ते २०१२ या काळात वाङ्मय मंडळांचे मेळावे, दरवर्षी साधारणपणे २५० विद्यार्थ्यांची उपस्थिती.
- विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा आणि
वाङमय मंडळे अनिवार्य होऊन त्यांना स्थायी निधी उपलब्ध व्हावा यासाठी यशस्वी
पाठपुरावा
- मुंबई विद्यापीठांतर्गत वाङ्मय मंडळांची पाहणी करण्यासाठी
सर्वेक्षण प्रकल्प कार्यन्वित.
- प्रकल्पाच्या काळात विविध महाविद्यालयांत विद्यार्थी –
शिक्षक बैठकांचे आयोजन
आगामी उपक्रम
- मराठी भाषा व वाङ्मय मंडळाच्या
सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मराठीतून संगणकसाक्षर करणे आणि मराठी अभ्यास केंद्राच्या
सहकार्याने युनिकोड प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करणे.
- महाविद्यालयातील अमराठी विद्यार्थी
व शिक्षकांसाठी व्यावहारिक मराठीच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करणे. शक्य असल्यास ही
व्यवस्था ऑनलाईन होईल असे पाहणे.
- मराठी भाषेतून रोजगाराच्या कोणत्या संधी
उपलब्ध आहेत आणि कोणत्या निर्माण होऊ शकतील यादृष्टीने प्रदर्शने, मार्गदर्शनपर
व्याख्याने, कार्यशाळा, क्षेत्रभेटी यांचे नियमित स्वरुपात आयोजन करणे.
- मराठी भाषा व वाङ्मय मंडळांचे
संकेतस्थळ युनिकोड मराठीत तयार करणे आणि मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून,
दरवर्षी प्रतिनिधिक स्वरुपात ई-नियतकालिक प्रदर्शित करणे.
- ज्या महाविद्यालयांमध्ये मराठी हा
विषय शिकवला जातो तिथे त्यांच्या अभ्यासक्रमांतील प्रकल्पांची सांगड,
विद्यार्थ्यांची साहित्यविषयक जाण विकसित करण्यासोबतच भाषाविषयक जाणीवजागृतीही
घडवणे.
- मराठी भाषाविषयक जनजागृती व्हावी
यादृष्टीने प्रत्येक महाविद्यालयात भाषा सप्ताहाचे आयोजन करणे आणि या दरम्यान
भाषाविषयक प्रश्नांवर पोस्टर प्रदर्शन, मराठी भाषा व संस्कृती विषयक प्रश्नमंजुषा
स्पर्धा, इंग्रजी शब्दांना मराठीतून पर्यायी शब्दनिर्मितीची स्पर्धा अशा
उपक्रमांचे आयोजन करणे.
- मराठी भाषाविषयक प्रश्नांची जाणीव जागृती
व्हावी यादृष्टीने व्याख्याने व मुलाखतींचे आयोजन करणे.
- महाराष्ट्रात मराठी भाषाविषयक
प्रश्न व त्यांच्या सोडवणुकीसाठी चाललेले प्रयत्न यांची विद्यार्थी व शिक्षकांना माहिती व्हावी यादृष्टीने
व्याख्याने आणि क्षेत्रभेटींचे आयोजन करणे.
- अमराठी विद्यार्थ्यांची मराठी भाषाविषयक
जाण वाढावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे.
आवाहन
आपापल्या
महाविद्यालयांत मराठी वाङ्मय मंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करावा. ज्यांच्या
महाविद्यालयात आधीच मराठी वाङ्मय मंडळ आहे त्यांनी ते अधिक सक्षम होण्यासाठी
विविध उपक्रम राबवावेत.