🔔 मासिक खर्चासाठी तातडीची आर्थिक गरज. मराठी अभ्यास केंद्राला प्रत्येक महिन्याला ₹४० ते ₹५० हजारांची आवश्यकता आहे. ₹१० पासून मासिक वर्गणीदार व्हा. आता मदत करा 🤝

मराठी अभ्यास केंद्र

“श्वास मराठीचा, ध्यास महाराष्ट्राचा”​

‘मराठी अभ्यास केंद्र’ ही गेल्या दोन दशकांपासून मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विधायक उपक्रम राबवणे, मराठीवरील अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणे, मराठी भाषिक समाजाच्या प्रबोधनासाठी वैचारिक चळवळ उभारणे अशा अनेक कामांमध्ये केंद्र आघाडीवर राहिलेले आहे. 

जातिधर्मापेक्षा भाषा हीच मराठी समाजाची मुख्य ओळख आहे आणि सर्व जातिधर्माच्या लोकांना सोबत घेऊनच मराठी भाषा-संस्कृती संवर्धनासाठी कार्य करायचे अशी धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी भूमिका केंद्राच्या स्थापनेपासून राहिलेली आहे.

मराठी भाषा संवर्धन

२०+ वर्षे कार्यरत

कृतिशील उपक्रम

दर्जेदार प्रकाशने

मराठीकारण

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून गेल्या ६५ वर्षांत मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचे काही प्रश्न आपण सोडवले, तर काही अधिक गंभीर प्रश्न निर्माण केले.

संघराज्याच्या चौकटीत महाराष्ट्राचा समतोल विकास, मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यातला आंतरसंबंध यांचा जेवढा सखोल विचार आपण करायला हवा होता, तेवढा केला नाही. त्यामुळे भाषेचे नियोजन आणि भाषेचे राजकारण या दोन्ही आघाड्यांवर आपण अपयशी ठरलो. त्यामुळे ‘गाथा सप्तशती’पासून सुरू झालेला आपला इतिहास कितीही अभिमानास्पद असला तरी या महाराष्ट्राचे आणि मराठी भाषेचे भवितव्य काय हा प्रश्न आपल्यापुढे आ वासून उभा आहे.

महाराष्ट्रधर्मावर आधारित मराठीकारण हे त्यावरचे उत्तर आहे, याला आम्ही संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा मानतो.

त्यासाठी उपलब्ध राजकीय – प्रशासकीय व्यवस्था यांच्याशी संघर्ष करावा लागेल. नवे विचारव्यूह, नवे चर्चाविश्व घडवावे लागेल. पण ते अपरिहार्य आहे. कारण मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीच्या अवहेलनेच्या कारणमीमांसेपलीकडे जाऊन संपूर्ण नवी मांडणी करणे हाच आपल्यापुढचा एकमेव मार्ग आहे.

आगामी कार्यक्रम

मराठीकारण जागर यात्रा

महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणे जेवढे महत्त्वाचे आहे, तितकेच रेल्वे मराठी माणसासाठी धावणे आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार मराठी माणसाला मिळणेही आवश्यक आहे.

महाराष्ट्रात हे आणि असे प्रश्न सोडवायचे असतील, तर आपल्याला ‘महाराष्ट्रधर्मावर’ आधारित ‘मराठीकारण’ उभे करावे लागेल.

आपण या कार्यक्रमांना येणार असल्यास, खालील Google अर्ज भरावा किंवा हा अर्ज इच्छुक व्यक्तींना पाठवावा, ही विनंती!

अर्जाचा दुवा:

https://tinyurl.com/3hfbnznww

 

मराठीकारण परिषद

‘मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईत महाराष्ट्र नाही’ हे आजचे वास्तव असले, तरी हे चित्र बदलण्यासाठी आपल्याला झटून कामाला लागावे लागेल. मुंबईतून घटत चाललेल्या मराठी वस्त्या आणि मराठी माणसाचा कमी होणारा टक्का रोखण्यासाठी, मराठी अभ्यास केंद्राने या महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त (१ व २ मे रोजी) ‘मराठीकारण परिषद’ या तीन टप्प्यांतील कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

आपण दोन्ही दिवस या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, ही विनंती! आपण या कार्यक्रमांना येणार असल्यास सोबतचा गूगल अर्ज भरावा आणि आपल्या संपर्कातील इच्छुक व्यक्तींनाही पाठवावा.

अर्जाचा दुवा:

ताज्या घडामोडी

कृतिगट​
0
प्रकाशने
0 +
आगामी प्रकल्प
0 +
कार्यक्रम
0 +

व्हिडिओ गॅलरी

डॉ. दीपक पवार यांचं टोकदार भाषण 

डॉ. दीपक पवार यांचा भेंडवडे (खानापूर, सांगली) गावातील ग्रामपंचायतीने केलेला सत्कार. #महाराष्ट्रधर्म

मुंबईतील मराठी शाळांच्या भूखंडांवर भूमाफियांचा डोळा, शाळा बंद पाडण्याचे नियोजनबद्ध षड्यंत्र !

सांगली पत्रकार परिषद – २५ ऑक्टोबर | डॉ. दीपक पवार | तिसऱ्या भाषेचा आणि नरेंद्र जाधव समितीचा फार्स

मराठी शाळा टिकल्या नाहीत तर मराठी भाषाही टिकणार नाही. डॉ. प्रकाश परब #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म

तुमची भाषा संपली, तर तुमची संस्कृती संपते. – डॉ. प्रकाश परब.

महाराष्ट्रावरील हिंदीच्या आक्रमणाविरोधात अभ्यासक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांची जाहीर सभा.

डॉ. दीपक पवार | मराठीकारण सभेतलं खणखणीत भाषण! 

मराठी भाषा पुरस्कार २०२३ – चिन्मयी सुमीत मनोगत

सर्व व्हिडिओ >

श्वास मराठीचा... ध्यास महाराष्ट्राचा

अभ्यास केंद्राची रचना ही कृतिगटांवर आधारित आहे. प्रत्येक कृतिगट हा त्या त्या विषयावरच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावरील शक्य असलेल्या उपायांची मांडणी समाजातील संबंधित घटकांपुढे करत असतो. समाजात विविध स्तरांवर चर्चा घडवून एक व्यापक कृतिआराखडा तयार करण्यावर केंद्राचा भर असतो.

आमच्या कार्याबद्दल मराठीप्रेमींच्या प्रतिक्रिया

आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन करीत आहोत.

आपणही आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अभिप्राय पाठवून या चळवळीत सहभागी व्हावे तसेच मदतीचा हातभार लावावा.