संस्थेची भूमिका

‘मराठी अभ्यास केंद्र’हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ
उभारूपाहणाऱ्या कार्यकर्त्यांचेसंघटन आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला
लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मानाचेस्थान मिळेल असेस्वप्न आपण
पाहिले. मराठी माणूस या राज्यातच नव्हे तर जगभर स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवेल अशी
आशा बाळगली. मराठी संस्कृतीचा भविष्यकाळ हा तिच्या इतिहासाइतकाच देदीप्यमान असेल
असेगर्जत राहिलो. प्रत्यक्षात स्थिती काय आहे ?
लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मराठीमागे पडत आहे. शिक्षणापासून
न्यायालयापर्यंत कुठल्याचक्षेत्रांत मराठीला मानाचेस्थान आपण मिळवून देऊ शकलो नाही.
देशविदेशात मराठी माणसांनी उत्कर्ष साधलापण हा उत्कर्षमराठी समाजाच्या तळाच्या
घटकांपर्यंत अजूनही पोचलेलानाही. समृद्धीचे दरवाजे ज्यांच्यासाठी खुले झालेत, अशांपैकी
बहुतेकांना मराठी भाषा, संस्कृतीशी फारसेदेणेघेणेराहिलेलेनाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात
मातृभाषा वगैरे जुनाट गोष्टींच्या फंदात न पडता व्यक्तिगतउत्कर्षाकडे लक्ष द्यावे अशी
भूमिकाराज्यकर्ते, नोकरशहा, अभिजनवर्गापैकी अनेकजण आग्रहाने मांडत आहेत. बहुजनसमाज
मात्र प्रगतीच्या संधींचा शोध घ्यायचा की आपली भाषा व समाज यांच्याशी निष्ठा राखायची
अशा कात्रीत सापडला आहे. आपली भाषा, समाज यांच्याशी बांधिलकी जपणे म्हणजे
प्रगतीच्या मार्गापासून लांब राहणे असे चित्र उभे रहात आहे. परिणामी मराठीच्या प्रश्नांवर
कोणी आणि कसेलढायचेअसा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने
सुरूझालेली चळवळ हे या कोंडीवरचे उत्तर आहे.
अभ्यासातून सिद्ध झालेली विधायक चळवळ हे मराठी अभ्यास केंद्राचेस्वरूप आहे.
प्रतिक्रियात्मक आणि प्रतीकात्मक पद्धतींनीआंदोलने चालवूनप्रश्न सुटल्यासारखे वाटतील. पण
सनदशीर मार्गाने, चिकाटीने केलेल्या पाठपुराव्याची सोबत त्यालानसेल तर हे यश तात्कालिक
ठरेल. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठीसाठी निर्माण झालेल्या विविध राजकीय
चळवळींतून या धोक्याची प्रचिती आपल्याला आलीच आहे. म्हणूनच आता मराठीची चळवळ
नव्या पायावर उभी राहायला हवी.

मराठी अभ्यास केंद्राविषयी

मराठी भाषा संवर्धन

कृतिशील उपक्रम

दर्जेदार प्रकाशने

श्वास मराठीचा... ध्यास महाराष्ट्राचा

अभ्यास केंद्राची रचना ही कृतिगटांवर आधारित आहे. प्रत्येक कृतिगट हा त्या त्या विषयावरच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावरील शक्य असलेल्या उपायांची मांडणी समाजातील संबंधित घटकांपुढे करत असतो. समाजात विविध स्तरांवर चर्चा घडवून एक व्यापक कृतिआराखडा तयार करण्यावर केंद्राचा भर असतो

कृतीगट

12

प्रकाशने

7

आगामी प्रकल्प

6

कार्यक्रम

200

अनुदिनी (ब्लॉग्स)

मराठी अभ्यास केंद्राच्या मान्यवरांचे लेख

गेली १७ वर्षे आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन करीत आहोत.

आपणही आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अभिप्राय पाठवून या कार्यास हातभार लावावा.