पार्श्वभूमी-
मराठी माणसाला स्वत:ची सर्वांगीण प्रगती अधिक वेगाने करण्यासाठी आवश्यक त्या सर्व माहितीचे संकलन करुन ती एका ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचे काम या कृतीगटाद्वारे होईल. मराठी भाषेच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे स्वत:चा आर्थिक विकास करु शकतो याची प्रचिती आपणांस या उपलब्ध माहितीवरून लक्षात येईल व त्यातून मराठी माणसात दृढ आत्मविश्वास निर्माण होईल. मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे आपल्याला रोजगाराच्या अनेक क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत हे या माहितीचे अवलोकन केल्यावर सहजपणे कळेल. मराठीचा वापर हा आजच्या आधुनिक युगात किती क्षेत्रांमध्ये आहे तसेच आपण मराठी भाषेमध्ये प्राविण्य मिळवून विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये स्वत:ची अधिक सक्षमपणे आर्थिक उन्नती करु शकतो असा सकारात्मक दृष्टिकोन समाजमानसात तयार होईल. मराठी माणसाचा मराठी भाषेबद्दल असणारा न्यूनगंड या माध्यमातून दूर होईल अशी आशा आहे.
ध्येय-उदिष्टे– महाराष्ट्रातील तसेच जगभरातील सर्वसामान्य मराठी माणसाला मराठी भाषेबद्दल, मराठी भाषिक सर्व क्षेत्रांतील यशस्वी व असामान्य व्यक्ती, सरकारी, निमसरकारी, खाजगी मराठी भाषेविषयासंदर्भात काम करणाऱ्या संस्था तसेच मराठीबद्दल विविध विषयांवरील माहिती सहजपणे उपलब्ध करुन देवून आर्थिक, वैचारिक व सामाजिक उत्कर्ष करता यावा यासाठी प्रयन्नशील राहणे.
कार्ये–
खालील विषयांसंबंधीत माहिती जसे नाव, पत्ते, संपर्क क्रमांक, कार्यालये इ. माहिती संकलित करणे. सदरची माहिती ही सहजपणे सर्वसामान्य मराठी माणसांना उपलब्ध करून देणे.
१. प्राध्यापक / शिक्षक
२. पत्रकार
३. वकील / न्यायाधीश
४. डॉक्टर
५. इंजिनिअर्स
६. उद्योजक
७. साहित्यिक
८. शासकीय कर्मचारी
९. लोकप्रतिनिधी
१०.स्वयंसेवी संस्था
११. राजकीय संस्था
१२. राजकीय पक्ष
१३. स्वातंत्र्यसैनिक
१४. व्यक्ती
१५. संस्था
१६. सेवा
१७. संसाधने
१८. मराठी कलाकार – नाट्य, चित्रकलांवत
१९. वाङमयीन /कला संस्था
२०. खेळाडू
२१. नियतकालिके ( भाषा, साहित्याला वाहिलेली )
२२. विद्यार्थी संघटना
२३. सहकारी संस्था
२४.जिल्हावार मराठी भाषकांची संख्या
२५. चळवळी
२६. भाषाविषयक घटनात्मक तरतुदी / कायदे अधिनियम
२७. कोशवाङमय
२८. मराठी शाळा
२९. कामगार संघटना
३०. तंत्रज्ञ – आयटी व इतर
३१. संशोधन संस्था
३२. ग्रंथालयं
३३. पुस्तकांची दुकानं
३४. पुस्तक जत्रा
३५. मराठी लोककलावंत
३६. पर्यटन स्थळे / धार्मिक स्थळे
३७. जत्रा ( कॅलेंडर्सच्या आधारे )
३८. बृह्महाराष्ट्र मंडळे/परदेशस्थ मराठी
३९. अनिवासी मराठी
४०. देशाच्या इतर विद्यापीठांतील मराठी विभाग
४१. कृषिउत्पन्न बाजार समित्या
४२. इतर राज्यातील भाषिक चळवळींची माहिती
४३. मराठी संकेतस्थळं
४४. मराठी कॉलसेंटर्स
४५. औद्योगिक प्रशिक्षण संस्था
४६. शासनाच्या भाषा, साहित्य-संस्कृतीविषयक योजना
४७. वृत्तपत्रं /वाहिन्या
४८. मराठी भाषेसंबंधी निवाडे
आवाहन
मराठी अभ्यास केंद्र अधिकाअधिक माहितीचे संकलन करण्याचा प्रयत्न करीत आहे. या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या वाचकांनीही या व्यतिरिक्त माहिती आपणाकडे असल्यास कृपया info@marathiabhyaskendra.org.in या मेल पत्त्यावर पाठवावी