२००६ साली मुंबई विद्यापीठाचा संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग व मराठी भाषा संरक्षण आणि विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘न्यायव्यवहारात मराठी : सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयावरील राज्यव्यापी परिषद
पुस्तक प्रकाशन, सत्कार सोहळा: दिनांक ११ डिसेंबर २०१० रोजी न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी’ या अधिवक्ते संतोष आग्रे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि न्यायव्यवहाराच्या मराठीकरणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांचा मानपत्र देऊन सत्कार.
न्यायालयीन कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी दि. २२ व २३ जानेवारी २०११ रोजी नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेच्या वार्षिक वकील परिषदेत वरील पुस्तकाच्या १५०० प्रती परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ते जयंत जायभावे यांच्या पुढाकाराने सर्व मान्यवर वकील व न्यायाधीशांना वितरीत. दोन दिवसांच्या या परिषदेमध्ये न्यायव्यवस्थेसंदर्भात अनेक विषयांवर न्यायमुर्तींनी तसेच राज्यभरातील वकीलांनी मनमोकळेपणाने आपली मते मांडली.
दि. १३ आणि १४ एप्रिल २०१३ रोजी ठाणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेच्या वार्षिक वकील परिषदेत वरील पुस्तकाच्या २००० प्रती परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ते प्रमोद पाटील, अधिवक्ते श्री. जयंत जायभावे आणि श्री. गजानन चव्हाण यांच्या पुढाकाराने सर्व मान्यवर वकील व न्यायाधीशांना वितरीत. दिनांक १३ एप्रिल रोजी पहिल्या सत्रात या परिषदेचे उद्याटन भारताचे कृषिमंत्री मा. शरदचंद्रजी पवार यांनी केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. पृथ्वीराजजी चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गणेश नाईक तसेच विधानपरिषदेचे उपसभापती मा. श्री. वसंत डावखरे आणि ठाणे जिल्ह्य़ातील सर्वपक्षीय खासदार व आमदार उपस्थित होते. या दिवशी दुसऱ्या सत्रात पारदर्शक न्यायदानासाठी मराठी भाषेचा वापर या विषयावर विचारमंथन करण्यात आले. न्यायदानात मराठीचा वापर होणेसाठी वकील परिषदेत सर्व सहभागींना चेअरमन अॅड. प्रमोद पाटील यांचेर्फे अॅड. संतोष आग्रे यांनी लिहीलेल्या न्यायाच्या प्रतिक्षेत मराठी ह्या पुस्तकाच्या २ हजार प्रती भेट देण्यात आल्या. न्यायदानात पारदर्शकता येण्यासाठी सर्वसामान्यांच्या म्हणजेच मराठी भाषेतून कामकाज होणे अत्यावश्यक असल्याचे सत्राचे प्रमुख वक्ते डॉ. दीपक पवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील न्यायव्यवहाराच्या मराठीकरणासाठी व प्रभावी अमंलबजावणीसाठी मराठी अभ्यास केंद्राचा कृती आराखडा निश्चित.