संस्थेचा इतिहास
आज मराठी अभ्यास केंद्रात काम करत असलेले बहुतांश कार्यकर्ते २००२ सालापासून मराठी भाषेच्या चळवळीत काम करत आहेत. महाराष्ट्र शासनाने २००२ साली ११ वी १२ वी साठी मराठीला माहितीतंत्रज्ञानाचा पर्याय दिला, त्याविरुद्ध सुरू झालेल्या आंदोलनात मराठीच्या शिक्षकांसोबत इतर अनेक क्षेत्रांतील लोकांनी भाग घेतला. एका अर्थाने मराठी अभ्यास केंद्राच्या कामाची मुहूर्तमेढ या आंदोलनामुळे रोवली गेली आहे.
मराठीच्या एकेका प्रश्नावर काम करून भागणार नाही, त्यासाठी अनेक आघाड्यांवर एकाचवेळी लढले पाहिजे असा विचार करून समविचारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली. यावेळी मराठीच्या चळवळीसाठी आधारभूत ठरणारे एक संशोधन केंद्र असावे अशा हेतूने १ मे २००९ रोजी मराठी अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली.
संस्थेची आजपर्यंतची वाटचाल
गेली अनेक वर्षे आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन करीत आहोत.
आपणही आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अभिप्राय पाठवाव्यात, संस्थेचे सभासदत्व घेऊन या कार्यात सहभागी व्हावे तसेच मदतीचा हातभार लावावा.