🔔 मासिक खर्चासाठी तातडीची आर्थिक गरज. मराठी अभ्यास केंद्राला प्रत्येक महिन्याला ₹४० ते ₹५० हजारांची आवश्यकता आहे. ₹१० पासून मासिक वर्गणीदार व्हा. आता मदत करा 🤝

बृहन्महाराष्ट्र

पार्श्वभूमी

महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेर अनेक मराठी भाषक स्थायिक झालेले आहेत. या मराठी भाषकांना आपल्या मातृभाषेची आणि संस्कृतीची सततच ओढ वाटत असते. त्यांपैकी काही जण आपल्या भाषा-संस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी प्रयत्न करत असतात. कधी हे प्रयत्न वैयक्तिक असतात, तर कधी सामूहिक असतात.

उद्दिष्ट

महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेर स्थायिक झालेल्या मराठी भाषकांचे मातृभाषा व संस्कृतीचे हे प्रयत्न, राबवण्यात येणारे विविध उपक्रम यांची एकमेकांना माहिती व्हावी, त्यातून विचारांची देवाणघेवाण व्हावी, नावीन्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण उपक्रमांना चालना मिळावी हा या कृतिगटाचा उद्देश आहे.

आवाहन

महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेर स्थायिक झालेले मराठी भाषक मातृभाषा व संस्कृतीविषयक उपक्रम राबवत असतील तर त्यांनी आम्हाला marathipalaksammelan2017@ gmail.com या मेलवर संपर्क साधावा.