🔔 मासिक खर्चासाठी तातडीची आर्थिक गरज. मराठी अभ्यास केंद्राला प्रत्येक महिन्याला ₹४० ते ₹५० हजारांची आवश्यकता आहे. ₹१० पासून मासिक वर्गणीदार व्हा. आता मदत करा 🤝

कृतिगट

विविध विषयांचा सखोल अभ्यास करून मांडलेल्या उपाययोजना आणि त्या उपाययोजनांवर आधारित कृतिलक्ष्यी चळवळ ही ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये आहेत.

अभ्यास केंद्राची रचना ही कृतिगटांवर आधारित आहे. प्रत्येक कृतिगट हा त्या-त्या विषयावरील प्रश्नांचा सखोल अभ्यास करून, त्यावरील संभाव्य उपायांची मांडणी समाजातील संबंधित घटकांपुढे करत असतो.  समाजात विविध स्तरांवर चर्चा घडवून व्यापक कृतिआराखडा तयार करण्यावर केंद्राचा भर असतो. त्या कृतिआराखड्यानुसार विशिष्ट कालमर्यादेत एखादा प्रश्न निर्णायकपणे सोडवण्यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा करणे, हे एक महत्त्वाचे कार्य असते.

आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन करीत आहोत.

आपणही आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अभिप्राय पाठवून या चळवळीत सहभागी व्हावे तसेच मदतीचा हातभार लावावा.